मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly election 2024) प्रचार जोरात सुरू झाला आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीसोबत इतर पक्ष देखील विविध रणनीती आखत आहेत. अशातच महायुतीच्या प्रचारासाठी राज्यात केंद्रातील बडे नेते मैदानात उतरणार आहेत.
नुकतेच पंतप्रधानांचे महाराष्ट्र प्रचार सभांचे वेळप्रत्रक जाहीर करण्यात आले आहे. मोदींची पहिली सभा राज्यात ८ नोव्हेंबर रोजी धुळ्यात पार पडणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी सभा घेणार आहेत.
पंप्रधानांनंतर आता केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांचे देखील महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक समोर आहे. अमित शाह यांची महाराष्ट्रातील पहिली सभा 08 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात होणार आहे.
या मतदारसंघात काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील निवडणुकीसाठी उभे आहेत. तर भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक उभे आहेत. 08 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दक्षिणमध्ये सभा झाल्यानंतर गुरुवारी शहा यांच्या चार सभा होणार आहेत.
अमित शाहांच्या सभांचे नियोजन ( गुरूवार, 08 नोव्हेंबर)
जनसभा 1 – शिराला विधानसभा
सकाळी 11:00 वाजता.
जनसभा 2 – कराड दक्षिण विधानसभा
12:300 वाजता.
जनसभा 3 – सांगली विधानसभा
02:15 वाजता.
जनसभा 4 – इचलकरंजी विधानसभा
‘या’ दिवशी होणार मतदान
राज्यात 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.