Maharashtra BJP : राज्यातील निवडणूका (Maharashtra Assembly Election 2024) आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता निडवणुकीची रंगत वाढत चालली आहे. याचदरम्यान भाजपने (Maharashtra BJP) राज्यातील बंडखोरांविरोध मोठी कारवाई केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांकडे आपले अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर पर्यंत मुदत होती. त्यामधील काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर काही बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत.
यावेळी महायुतीच्या तीनही पक्षांमध्ये सर्वाधिक बंडखोरी दिसून आली आहे. त्यातही भाजपमध्ये बंडखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार आज राज्यातील विविध मतदारसंघातील 40 बंडखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचा आदेश डावलून शिस्तभंग केल्याबद्दल या नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपने कुणाची पक्षातून केली हकालपट्टी?
सावंतवाडी – विशाल प्रभाकर परब
अकोट – गजानन महाले
वाशिम – नागेश घोपे
बडनेरा – तुषार भारतीय
अमरावती – जगदीश गुप्ता
अचलपूर – प्रमोद सिंह गडरेल
साकोली – सोमदत्त करंजेकर
आमगांव- शंकर मडावी
चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
ब्रम्हपूरी – वसंत वरजुरकर
वरोरा – राजू गायकवाड, अतेशाम अली
उमरखेड – भाविक भगत, नटवरलाल उंतवल
नांदेड उत्तर – वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख
नांदेड दक्षिण- दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे,
घणसावंगी – सतीश घाटगे
जालना – अशोग पांगारकर
गंगापूर- सुरेश सोनावणे
वैजापूर -एकनाथ जाधव
मालेगांव बाह्य – कुणाल सूर्यवंशी
बागलान- आकाश साळुंख, जयश्री गरुड
नालासोपारा- हरिष भगत
भिवंडी ग्रामीण- स्नेहा देवेंद्र पाटील
कल्याण पश्चिम – वरुण सदाशिव पाटील
मागाठणे – गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी पूर्व- धर्मेंद्र गोपीनाथ ठाकूर
अलिबाग – दिलीप भोईर
नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
सोलापूर शहर – उत्तर शोभा बनशेट्टी
अक्कलकोट – सुनील बंडगर
श्रीगोंदा -सुवर्णा पाचपुते
जळगांव शहर – मयुर कापसे, आश्विन सोनवणे
धुळे ग्रामीण – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी यावेळी एकूण १०,९०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६५४ उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. तर ९२६० उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी ९८३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. अशा स्थितीत आता एकूण ८२७२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.