PM Narendra Modi : अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना 277 मते मिळाली असून, त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दुसरीकडे कमला हॅरिस या शर्यतीतून बाहेर आहेत. अशास्थितीत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच पीएम मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत एक संदेश देखील लिहिला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळातील त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. तसेच पुढे मोदींनी भारत-अमेरिका जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करेल अशी अशा देखील व्यक्त केली आहे.
https://x.com/narendramodi/status/1854075308472926675
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या X या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की, “तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून अभिनंदन…. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळात चांगली कामगिरी केलीत. भारत-अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया”, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. ज्यावरून दोन्ही नेत्यांमधील बॉन्डिंग दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प मिठी मारताना दिसत आहे. दुसरा फोटो ट्रम्प यांच्या भारत भेटीचा आहे, जेव्हा पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. तिसरा फोटो पीएम मोदींच्या अमेरिकन दौऱ्याचा आहे, ज्यामध्ये ते डोनाल्ड ट्रम्प यांचा हात धरताना दिसत आहेत. चौथा फोटो G7 शिखर परिषदेदरम्यान काढण्यात आला असून या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील खास मैत्री दिसून येत आहे.