Fire In Wardha Steel Company : महाराष्ट्रातील वर्धा (Wardha) येथे मोठी दुर्घटना घडली आहे. भुगाव स्टील (Steel Company) कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 22 कर्मचारी जखमी झाले आहेत तर एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्यास सुरुवात केली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.
Wardha, Maharashtra | 16 workers were injured after a fire broke out at Bhugaon steel Company in Wardha district. All the injured have been admitted to the hospital for treatment. One of them is in critical condition. The fire has been brought under control. An inquiry has been…
— ANI (@ANI) November 6, 2024
कंपनीत लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी कंपनील काही द्रव्यांचा स्फोट झाल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पाहायला मिळाले आहे. स्थानिकांनी व अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केल्याचे दिसून आले आहे. कंपनीत लागलेल्या या आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे लोट दूरपर्यंत पसरल्याने कंपनीतील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.