Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात आला आहे. आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वचननामा जाहीर करण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या वचननाम्यामध्ये महिला, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्याबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वचननाम्यामध्ये काय घोषणा केल्या आहेत. जाणून घेऊया….
#WATCH | #MaharashtraElection2024 | Mumbai: Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray & senior leaders of the party release 'Vachan Nama' for the state elections. pic.twitter.com/oPAaePIoE0
— ANI (@ANI) November 7, 2024
ठाकरेंच्या वचननाम्यातील घोषणा-
-प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.
-शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षे स्थिर ठेवणार.
-महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार,
-प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४४७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार.
-अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
-प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
-जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.
-सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
-मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.
-बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार, निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.
-‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.
-वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.
-धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार.