Shah Rukh Khan : सलमान खाननंतर (Salman Khan) आता भारतीय अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याला देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फैजान खान नावाच्या व्यक्तीने अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमकी दिली आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्रातील वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रायपूर येथील आरोपीने अभिनेत्याकडे मोठी खंडणी मागितली असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, छत्तीसगडमधील रायपूर येथे राहणाऱ्या फैजान नावाच्या व्यक्तीने धमकीचा फोन केला असल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक तपासासाठी रायपूरला गेल्याची माहिती आहे. अभिनेता शाहरुख खानला धमकावल्याप्रकरणी बाई येथील वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३०८(४), ३५१(३)(४) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कॉल छत्तीसगडमधील रायपूरमधून आल्याच्या वृत्ताला मुंबई पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नसला तरी, रायपूर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे की, मुंबई पोलिस फैयाज खान नावाच्या व्यक्तीला शाहरुख खानला धमकावल्याबद्दल नोटीस बजावणार आहेत.
मुंबई के बांद्रा पुलिस स्टेशन में एक अज्ञात व्यक्ति के खिलाफ अभिनेता शाहरुख खान को कथित तौर पर धमकी देने का मामला दर्ज किया गया है। बीएनएस की धारा 308(4), 351(3)(4) के तहत मामला दर्ज किया गया है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है।
(फाइल फोटो) pic.twitter.com/Ouzp6NMVcP
— ANI_HindiNews (@AHindinews) November 7, 2024
ऑक्टोबरमध्येही मिळाली होती धमकी
शाहरुखला याआधीही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पठाण आणि जवान या चित्रपटांच्या यशानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या संदर्भात अभिनेत्याने महाराष्ट्र पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती, त्यानंतर त्याला वाय सुरक्षा देण्यात आली होती.