US Presidential Elections : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (US Presidential Elections) अजूनही काही राज्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे. मात्र, मुख्य निकाल समोर आले असून अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना निवडणुकीत २७७ इलेक्टोरल मतांसह बहुमत मिळाले असून ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे.
‘या’ दिवशी घेणार शपथ
ट्रम्प यांच्या विजयानंतर ते अध्यक्षपदाची शपथ कधी घेणार, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. ट्रम्प हे 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. शपविधीचा कार्यक्रम अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे असलेल्या यूएस कॅपिटल इमारतीत पार पडणार आहे.
अमेरिकेत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अमेरिकन जनतेचे आभार मानले आहेत. विजयानंतर आपल्या पहिल्या भाषणात ट्रम्प म्हणाले, ‘पुढील 4 वर्षे अमेरिकेसाठी उज्ज्वल असतील.’ पुढे ट्रम्प म्हणाले की, या निवडणुकीसारखे दृश्य मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. ट्रम्प यांनी इतर काही महत्त्वाच्या विषयांवरही भाष्य केले ज्यावर ते त्यांच्या कार्यकाळात काम करतील.’ तसेच अमेरिकेसाठी हा सोनेरी काळ असेल. असे देखील ते आपल्या पहिल्या भाषणात म्हणाले आहेत.