Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात महिला तसेच तरुणांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणत्या काय घोषणा करण्यात आल्या आहेत. पाहूया.
यामध्ये महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना दरमहा 3,000 हजार रुपये तसेच महिलांसाठी मोफत बससेवा देण्याच वचन काँग्रेसने दिलंय. तसेच समानता या तत्त्वानुसार जात जनगणनेच आश्वासन दिलं आहे. सोबतच सध्या अस्तित्वात असलेली 50 टक्के आरक्षणाची मर्यादा देखील काढून टाकणार असल्याची ग्वाही काँग्रेसने दिली आहे.
25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि त्याच योजने अंतर्गत मोफत औषध देण्याचं वचन हे कौटुंबिक संरक्षण नुसार देण्यात आले आहे.
तसेच कृषी समृद्धी अंतर्गत शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे आणि नियमित कर्ज परतफेडीसाठी ५०, ००० रुपयांचे प्रोत्साहन व राज्यातल्या बेरोजगारांना दरमहा ४,००० रुपयांची मदत देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
महालक्ष्मी
🔹 महिलांना दरमहा 3,000 रुपये
🔹 महिलांसाठी मोफत बससेवा
समानता
🔹 जात जनगणना होईल
🔹 ५०% आरक्षणाची मर्यादा काढून टाकणार
कौटुंबिक संरक्षण
🔹 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा
🔹 मोफत औषध
कृषी समृद्धी
🔹शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे
🔹नियमित कर्ज परतफेडीसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन
तरुण वर्ग
🔹 बेरोजगारांना दरमहा 4,000 रुपयांची मदत.