Narendra Modi : “धुळ्यातील सर्वांना रामराम…धुळ्याची ही धरती आणि महाराष्ट्रासोबतचे माझे नाते तुम्हा सर्वांना माहित आहे. महाराष्ट्राला मी जे मागितले ते महाराष्ट्रातील लोकांनी दिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मी धुळ्यात आलो होतो. मी तुमच्याकडे भाजप सरकारसाठी आग्रह केला होता. तुम्ही महाराष्ट्रात 15 वर्षाची सत्ता मोडून भाजपला सत्ता दिली. आज पुन्हा मी धुळ्यात आलो आहे. धुळ्यातूनच मी महाराष्ट्राच्या प्रचाराचा शुभारंभ करत आहे. तुमचे प्रेम, अफाट जनसमर्दन, जनसमुह हा उत्साह खरोखर उत्साह वाढवतो. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. तुम्हाला मी विश्वास देतो. मागील २ वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती थांबणार नाही. महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेऊन ठेऊ,” असा विश्वास पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या प्रचारासाठी त्यांची पहिली सभा धुळ्यात आयोजित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेला संबोधीत करताना मोदींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विकासावर देखील भाष्य केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सभांचा धडाका सुरु आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी बडे नेते मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींची आज धुळ्यामध्ये एक सभा पार पडली आहे. आता पंतप्रधान नाशिक मध्ये असून, दुसऱ्या सभेला संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला बहुमत देऊन पुन्हा राज्यात सत्ता आणा असे आवाहन केले आहे.