Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सभांचा धडाका सुरु आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील राज्यात विविध भागात सभा घेत आहेत. दरम्यान, दुपारी एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यातील संभाजी चुटे रंगमंदिराच्या मैदानावर जनतेशी संबोधित करत होते.
यावेळी एकनाथ शिंदे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आले होते. ‘नरेंद्र भोंडेकर यांना विकासाची प्रचंड तळमळ आहे. त्यांच्या डोक्यात नेहमी मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्नच असतात. विकासाचे दुसरे नाव नरेंद्र असलेल्या या आमदाराची हॅट्ट्रिक व्हायला हवी. त्यासाठी विजयाचा ‘भंडारा’ उधळण्यासाठी सज्ज व्हा…’ असे एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित करताना म्हंटले आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवारांना जिंकून द्या असे आवाहन देखील केले आहे. तसेच ‘मी २३ तारखेच्या विजयाचे फटाके फोडण्यासाठी शुभेच्छा द्यायला आलो आहे. असे देखील म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सभेला यावेळी महिलांची प्रचंड गर्दी होती. ‘आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. लाडकी वहीण योजनेचा सन्मान निधी दिवाळीपूर्वी दिला आहे. निवडणुका होताच डिसेंबरमध्ये अग्रिम हप्ता दिला जाईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. पुढे, त्यांनी राज्यात राबविलेल्या योजनांची देखील माहिती दिली आहे.
विकास कामांवर बोलताना शिंदे म्हणाले, ‘भंडाऱ्याच्या जल पर्यटन प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या प्रकल्पाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून हजारो स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. मी कॉमनमॅन मुख्यमंत्री आहे. आमचे सरकार गरीब, शेतकरी, बहिणींसाठी हप्ते भरणारे आहे. तर दुसरे सरकार हप्ते खाणारे आणि जेलमध्ये जाणारे आहे. असा घणाघात देखील एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.