Uddhav Thackeray : सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यासातच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेतून (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे (ubhash Bapurao Wankhede) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. सुभाष वानखेडे यांना पक्षाने बाहेरच्या रस्ता दाखवल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण अधिकच तापले आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून (यूबीटी) ही मोठी कारवाई मानली जात आहे.
शिवसेनेने सादर केलेल्या पत्रकात हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे म्हंटले आहे. तसेच हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
याआधी भारतीय जनता पक्षानेही पक्षविरोधी कारवायांमुळे ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर काँग्रेसनेही बंडखोरांवर कारवाई करत काही नेत्यांना 6 वर्षासाठी निलंबित केले आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. ज्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला सर्व मतदारसंघांचे निकाल एकत्रित जाहीर होणार आहेत.
काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी महायुती सरकारला सत्तेवरून हटवण्याच्या उद्देशाने पुढे जात आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यासमोर पुन्हा एका सत्तेत राहण्याचे आव्हान असणार आहे.