Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे खंडन करत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
त्यांनी स्पष्ट केले आहे की, ईडीपासून सुटका करण्यापासून आम्ही सर्व भाजपसोबत गेलो, असा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून आमच्यावर होतो आहे. मला महाराष्ट्र सदन प्रकरणातून देखील न्यायालयाने क्लिनचीट दिली आहे, अशी आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली. तसेच वकिलांसोबत बोलून या प्रकरणाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं देखील भुजबळांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही. बातम्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आरोपांचे खंडन करताना ते म्हणाले की, ईडी पासून पळून जाण्यासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आरोप आमच्यावर अनेक वर्षांपासून केला जात आहे. “मला तुरुंगात जाण्याची भीती नाही.’ आम्ही कोणाच्या दबावाखाली नाही आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सत्तेत आलो आहोत. असे त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
दरम्यान, राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.