Pune : जगात भारताची ओळख बुद्ध भूमी अशी आहे. जगातील प्रत्येक बौद्ध आपल्या देशात येऊन तथागत गौतम बुद्धाच्या चरणी लीन होऊ इच्छित असतो, बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मात्र या ठिकाणी भेटी दिल्या नंतर विदेशी नागरिकांना प्रश्न पडायचा या स्थळांचा, परिसराचा विकास भारत सरकार का करत नाही? परंतु मागी दहा वर्षात हे चित्र पालटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा बदल झाला आहे. महाराष्ट्रात अजिंठा – वेरूळ शिवाय अनेक ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत, या बौद्ध लेण्यांचा आणि बौद्ध पर्यटन स्थळांचा विकास केंद्र सरकार करणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक व संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
सम्यक विहार विकास केंद्र, भाऊ पाटील रोड बोपोडी येथे बौद्ध समाज बांधवांशी मुक्त संवाद..! या कार्यक्रमात किरेन रिज्जुजी बोलत होते. यावेळी परशुराम वाडेकर (अध्यक्ष, विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे), पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, भंते नागघोष थेरो, भंते थान (व्हिएतनाम), भंते यश, माजी नगसेविका चंद्रकांता सोनकांबळे, आनंद छाजेड, अविनाश कदम आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच मी आज इथे आहे. देशातील एससी, एसटी, ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम भारतीय संविधान करते, बाबसाहेबांनंतर 70 वर्षांनी एका बौद्ध व्यक्तीला कायदा मंत्री होण्याचे भाग्य मला पंतप्रधान मोदी यांच्या मुळे लाभले. आज अल्पसंख्याक मंत्री त्यांनी मला दूरदृष्टीने केले आहे. कारण अन्य अल्पसंख्याक समाजांचाही विकास होणे आवश्यक आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, ‘आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीत बौद्ध जयंती साजरी करण्यात आली, ही पानपरा आता मागील दहा वर्षांपासून सुरू आहे. भारतीय संविधानाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत, यंनिमित 25 नोव्हेंबर पासून केंद्र सरकारच्या वतीने मोठ्या उत्साहात विविध कार्यकरमांचे आयोज करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांनी भारतीय संविधानाला भाजप कडून कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, भारतीय संविधानाच्या प्रचार, प्रसारासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. संविधानाचे प्रास्ताविक घरोघरी, मोक्याच्या ठिकाणी, चौकात लावणे, जनजागृती करणे, इंटरनॅशनल संविधान दौड, शालेय विद्यार्थ्यांसाठी संविधान रन, पुणे महापलिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला आहे. संविधान दिन साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने देशभर त्या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याणक्याकडे सुद्धा ही मागणी केल्याचे वाडेकर यांनी सांगितले.