Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर काँग्रेसने आणखी काही बंडखोरांवर कारवाई मोठी केली आहे. काँग्रेसने (Congress) राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या 16 जणांना निलंबित केलं आहे. पक्षाने या उमेदवारांना 6 वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित केले आहे. ही कारवाई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेसने कसबा, शिवाजीनगर, पर्वती, गडचिरोली, भंडारा, भिवंडी, मिरा-भाईंदर, अहमदनगर शहर, कोपरी-पाचपाखाडी, यवतमाळ, राजापूर, काटोल या मतदारसंघातील बंडखोरांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
पक्षाने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरी बंडखोरांनी माघार घेतली नाही. अखेर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. करवाई करण्याआधी काँग्रेसने या बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. यासंबंधित त्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या.
काँग्रेसच्या वरिष्ठांनी काढलेल्या समजुतीनंतर काही बंडखोरांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर काहीजण ठाम राहिले. अशा परिस्थितीत काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
Congress State President Nana Patole suspends 16 rebel candidates of the Congress party for a period of 6 years. pic.twitter.com/ljacqlOVFA
— ANI (@ANI) November 10, 2024
काँग्रेस कारवाई केलेल्या उमेदवारांची नावे :-
काँग्रेसने आनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर – आरमोरी, सोनल कोवे, भरत येरमे -गडचिरोली, अभिलाषा गावतूरे, राजू झोडे- बल्लारपूर, प्रेमसागर गणवीर- भंडारा, अजय लांजेवार-अर्जुनी मोरगाव, विलास रघुनाथ पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर-भिवंडी, हंसकुमार पांडे-मीरा भाईंदर, कमल व्यवहारे-कसबा पेठ, मोहनराव दांडेकर-पलूस कडेगाव, मंगल विलास भुजबळ-अहमदनगर शहर, मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे-कोपरी पाचपाखाडी, विजय खडसे-उमरखेड, शबबीर खान-यवतमाळ, अविनाश लाड-राजापूर, याज्ञवल्क्य जिचकार-काटोल, राजेंद्र मुळक-रामटेक. या उमेदवारांवर कारवाई केली आहे.