अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपकडून रोष ओढवून घेतला आहे.अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारसभेत पटोले बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी समुदायातील लोकांना उद्देशून केलेल्या एका वक्तव्यामध्ये त्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
“’ज्या भाजपाने तुम्हांला ‘कुत्रा’ म्हणून संबोधले त्यांना आता ओबीसी समाज मतदान करणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.उलट भाजपलाच आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. तसेच आता या महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या या पक्षाला जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.‘भाजपवाले स्वतःला देव समजतात, त्यांची मस्ती वाढली आहे.दिल्लीतील लोक स्वतः ला विश्वगुरू मानतात. तर महाराष्ट्रात फडणवीस स्वतः ला देव मानतात.त्यामुळे त्यांच्या सत्तेचा माज उतरवून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे म्हणत पटोलेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.तसेच भाजपची विचारसरणी मनुस्मृतीतून निर्माण झाली आहे आणि काही निवडक लोकांनी राज्य करत राहण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे .
विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.त्याचबरोबर जाहीर सभांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाले आहेत.आता जाहीर सभांमध्ये वक्तव्य करताना नेत्यांची जीभ घसरताना दिसत आहे.
https://twitter.com/ANI/status/1856195743553605641
उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना व्यापारी, दुकानदार वर्गाबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती.आपल्या फायद्यासाठी व्यापारी,दुकानदार लोकांना फसवतात, त्यांची दिशाभूल करतात असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर भाजपसह व्यापारी संघटनेने नाराजी व्यक्त केली होती. .