मोदींनी चिमूरमधल्या आपल्या प्रचारसभेत हल्लाबोल करताना म्हटले की, महाविकास आघाडी हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खिलाडी आहेत. महाविकास आघाडीच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प बंद पडले. तसेच महाविकास आघाडीने कधीही विकासाची कामे होऊ दिले नाही. आघाडीच्या नेत्यांनी फक्त कामे बंद पाडण्याचे प्रयत्न केले. विकासाचे कामे बंद पाडण्यात विरोधी पक्षाची पीएचडी झाली असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी मोदींचा प्रचारसभेचा आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी धुळ्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांना सुरुवात केली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात चिमूरच्या क्रांतिकारकांना अभिवादन करून केली. बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीला देखील अभिवादन केलं.
एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करत आहे. मात्र विकासकामात अडथळा निर्माण करणारी ही महाविकास आघाडी म्हणजे बिघाडी आहे. तसेच , कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. तसेच, चंद्रपूरने अनेक वर्षे नक्षलवाद सहन केला, अनेक तरुणांचे बळी गेले.त्यामुळे या भागात उद्योग येऊ शकले नाहीत. मात्र आम्ही नक्षलवादावर लगाम लावला. त्यामुळे या भागात आता उद्योग येत आहेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. .
जम्मू-कश्मीर अनेक दशकं दहशतवादात होरपळत होता, संविधानाची माळ जपणाऱ्यांनी सात दशकं बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कश्मीरमध्ये लागू होऊ दिलं नाही. मात्र, मोदी सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवून काश्मीरमधील लोकांचं भारताशी नातं जोडलं. आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आम्ही कलम 370 हटवले. पण, काँग्रेसवाल्यांना हे पचनी पडत नाही,असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला.
“महायुती सरकार कोणत्या गतीने काम करते आणि हे आघाडीचे लोक काम कसे थांबवतात, हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा चांगले कोणाला कळणार? येथील लोक अनेक दशकांपासून रेल्वे जोडणीची मागणी करत आहेत, पण काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी हे काम कधीच होऊ दिले नाही. होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी विरोधी आघाडीवर टीकास्त्र सोडले.
“महायुतीबरोबरच, केंद्रातील एनडीए सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिन सरकार आहे. याचा अर्थ विकासाचा दुहेरी वेग आहे. महाराष्ट्रातील जनतेने गेल्या अडीच वर्षांत विकासाचा हा दुहेरी वेग पाहिला आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.पीएम मोदी म्हणाले की, भाजपचा जाहीरनामा पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रासाठी ‘विकास की हमी’ (विकास हमी) असेल.
भाजप सरकारच्या काळात राज्यातील घडामोडींवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होत असलेले राज्य आहे. येथे नवीन विमानतळ आणि नवीन एक्स्प्रेस वे बांधले जात आहेत. सुमारे डझनभर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. महाराष्ट्रात, येथील 100 हून अधिक स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे आणि अनेक रेल्वे मार्गांचा विस्तार केला जात आहे.”
पीएम मोदी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणूक निकाल स्पष्ट आहेत, ज्याचा पुरावा लोकांच्या प्रचंड मतदानातून दिसून येतो. हाच वाढता पाठिंबा राज्यात पूर्ण बहुमतासह महायुतीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत देत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे .