Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, राज्यात प्रचार सभांचा जोरदार धडाका सुरु आहे. तसेच अनेक बड्या नेत्यांच्या मुलाखती देखील समोर येत आहेत. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्यांनी बारामती विधानसभा मतदार संघांचे आणि शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्याबाबत एक मोठा दावा केला आहे.
एका खाजगी युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार म्हणाले आहेत की, ‘युगेंद्रला मी लहान पणापासून पाहत आलोय. त्याचा जन्म मुंबईतच झाला आणि त्याच सगळ बालपण देखील मुंबईतच गेल आहे. त्याला कधीचं बारामती आणि सभोवतालचा परिसर आवडायचा नाही.’ अजित पवारांचे हे विधान ऐन विधासभेच्या तोंडावर आले आहे. त्यामुळे याचा जोरदार फटका युगेंद्र पवार यांना बसणार आहे हे नक्की झालंय.
नुकतीच अजित पवार यांची एक सभा पार पडली आहे जिथे त्यांनी लोकसभेत झालेल्या पराभवाबद्दल पुन्हा एकदा खंत व्यक्त केली आहे. बारातमतीत लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरूद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली होती. ज्यात सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला. त्यांच्या या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात घर करून राहिली असल्याचे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीकरांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार नुकतीच व्यक्त करून दाखवली होती.
दरम्यान, अजित पवार यांच्यासमोर शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे उभे आहेत. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट काका विरूद्ध पुतण्या अशी लढत होत आहे. त्यामुळे बारामतीतील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच अजित पवारांनी केलेले हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच रंगले आहे.