आज झारखंड विधानसभा निवडणुकीसोबतच देशातील 10 राज्यांमध्ये पोटनिवडणुकाही होत आहेत. यामध्ये 31 विधानसभा जागा आणि केरळ, वायनाडच्या लोकसभेच्या एका जागेचा समावेश आहे. या सर्व जागांवर आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली.
पश्चिम बंगालच्या सहा राज्यांमध्ये, बिहारच्या चार, आसामच्या पाच, कर्नाटकच्या तीन, राजस्थानच्या सात, गुजरातच्या वाव विधानसभेच्या जागा, छत्तीसगडच्या रायपूर शहराच्या दक्षिण आणि मध्य प्रदेशच्या बुधनी आणि विजयपूरच्या जागांवर पोटनिवडणूक होत आहे. यापैकी दलित समाजासाठी चार, आदिवासी समाजासाठी सहा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी २१ जागा राखीव आहेत.
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाला आहे.आता काँग्रेसने प्रियंका गांधी यांना येथून उमेदवारी दिली आहे. प्रियांकाची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.