कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला शिख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी ही जयंती आज (दि.१५ ) रोजी साजरी केली जात आहे . जगभरात पसरलेल्या शीख धर्माच्या लोकांसाठी ही जयंती आणि जयंतीच्या पर्वाला खूप महत्वाचे स्थान आहे.
गुरू नानकांचा जन्म लाहोरजवळ रायभोई दी तलवंडी त्याला आता नानकाना साहिब म्हणून ओळखलं जातं. ते स्थान सध्या पाकिस्तानमध्ये आहे. इथल्या हिंदू कुटुंबात जन्म झाला. कल्याणचंद दास बेदी उर्फ मेहता कालू आणि तृप्ता हे त्यांचे आई – वडील. हे घराणं मूळच व्यावसायिक व्यापारी होते. काही पंजाबी आख्यायिकांमध्ये असं सांगितलं जात की नानकांचा जन्म झाला त्यावेळी दाईला स्वर्गातून मधुर संगीत ऐकायला आलं होतं. विवाहयोग्य झाल्यावर नानकांचा विवाह बटाला शहरातील मूलचंद आणि चांदो राणी यांची मुलगी माता सुलख्नीदेवी यांच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुलं झाले. श्रीचंद आणि लखमीचंद. पुढे नानकांनी शीख धर्माची स्थापना केली. या धर्माचा प्रमुख ग्रंथ श्रीगुरूग्रंथ साहिब म्हणून ओळखला जातो. नानकांच्या उपदेशात देवाची भक्ति करा. कारण भक्तीत सगळं काही समाविष्ट आहे, असा साधा – सरळ आणि सोपा असायचा. संपूर्ण मानवतेच्या निःस्वार्थ सेवेत गुंतवून घेणे, सर्वांच्या चांगल्यासाठी आणि समृद्धीसाठी व सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे आणि प्रामाणिक आचरण करत उदरनिर्वाह करणे आदि बाबी समाविष्ट होत्या. पुढे नानकांचे सुपुत्र श्रीचंद यांनी ज्ञान प्राप्त केले आणि ते उदासी पंथाचे संस्थापक बनले.
यावर्षी गुरु नानक यांची ५५५ वी जयंती साजरी होत आहे. नानक यांना नानक देव, बाबा नानक आणि नानकशाह अशा नावांनीही ओळखले जाते. शिखांचे पहिले गुरु असण्याबरोबरच ते धार्मिक सुधारक, समाजसुधारक, कवी, देशभक्त, तत्त्वज्ञ आणि योगीदेखील होते. त्यांनी नेहमीच समाजाला एकत्र आणण्याचा संदेश दिला. जातीवाद, भेदभाव नष्ट काराऊं त्यांनी समाजात परस्पर बंधुभाव वाढावा यासाठी त्यांनी अनेक प्रवचनेही दिली. नानक नाम जहाज है, चढ़े सो उतरे पार, तू ही मेरा राखिया, तू ही सिरजनहार अशा स्वरूपाची प्रार्थना आजही पंजाबमध्ये केली जाते.