गृहमंत्री अमित शहा यांनी आज दुमका विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित केले, जिथे त्यांनी आदिवासी समाजाची दिशाभूल केल्याबद्दल झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. आणि हेमंत सोरेन सरकार वोट बँकेसाठी घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला.तसेच झारखंडमध्ये भाजपचे सरकार आल्यास घुसखोरांना हाकलून दिले जाईल असेही सांगितले.
शाह यांनी जेएमएम आणि काँग्रेसवर घुसखोरांना संरक्षण दिल्याचा आरोप करत शाह म्हणाले की, ते त्यांच्या व्होट बँकेसाठी घुसखोरांना प्रोत्साहन देत आहेत. घुसखोर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यांदा लग्न करून त्यांची स्थानिकांची जमीन बळकावत स्थानिक तरुणांचा रोजगार हिसकावत आहेत. भाजपचे सरकार आल्यास 23 नोव्हेंबरनंतर हेमंत सरकार जाणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे,तसेच ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, केंद्र सरकार ती त्यांना परत मिळवून देईल असेही त्यांनी सांगितले आहे.
समान नागरी संहिता (यूसीसी) वर बोलताना शाह यांनी आदिवासींना आश्वासन दिले की त्याच्या अंमलबजावणीमुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही. ते म्हणाले, “झारखंडमध्ये JMM आणि काँग्रेस अफवा पसरवत आहेत की UCC आल्यास आदिवासींना समस्यांना सामोरे जावे लागेल. आदिवासी बंधू आणि भगिनींनो, काळजी करू नका, तुमचा UCC मध्ये समावेश केला जाणार नाही. त्यामुळे UCC मुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. “
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा खरपूस समाचार घेत शाह यांनी आरोप केला की, “जेव्हा तुम्ही झारखंडसाठी लढत होता, तेव्हा तुमच्यावर गोळ्या आणि लाठ्यांचा वर्षाव झाला होता. काँग्रेस सरकारने झारखंडला त्याचे हक्क दिले नाहीत आणि आज मुख्यमंत्री होण्यासाठी पुन्हा त्याच काँग्रेसच्या मांडीवर बसले आहेत.
आदिवासी प्रतिकांचा सन्मान करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना शाह यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या योगदानाबद्दल सांगितले. “काल भगवान बिरसा मुंडा यांची जयंती होती. दिल्लीतील सराय काले खान चौकात भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा बसवण्यात आला ज्याला हेमंत सोरेन यांनी विरोध केला होता.
गृहमंत्री पुढे म्हणाले, “2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरी करण्याची घोषणा केली. यासोबतच मोदींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येत असून ही समिती हे संपूर्ण वर्ष (बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती) आदिवासी गौरव वर्ष म्हणून साजरी करण्यात येणार आहे.
झारखंडच्या निर्मितीत भाजपच्या भूमिकेचेही केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले. “झारखंडच्या निर्मितीचे काम भाजपचे महान नेते, आमचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते आणि आता झारखंड सुधारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत” असे शाह म्हणाले आहेत. तसेच राज्यात विकास आणि सुरक्षा आणण्यासाठी भाजपला पाठिंबा द्यावा असे आवाहनही शाह यांनी केले आहे.