पंतप्रधानांच्या पुणे येथे नुकत्याच झालेल्या दौऱ्यात १५ मिनिटे पाच जणांसाठी खास राखून ठेवली होती .निवडणूकीच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्र भाषा समिती , पुणेचे अध्यक्ष जयराम फगरे , वय वर्ष ९४ ,यांच्या हस्ते सन्मानपत्र स्विकारले. फगरे सरांनी चांदीचे सन्मान चिन्ह खास मोदीजींना देण्यासाठी तयार करून ठेवले होते .मोदी हिंदी भाषेचे दूत आहेत म्हणून त्यांचा सत्कार करायचा फगरे यांच्या मनात होता. तो योग १२ नोव्हेंबरच्या मोदींच्या दौऱ्यात आला.
एकता मासिकाच्या संपादिका रुपाली भुसारी यांनी सप्टेंबरच्या अंकात फगरे यांच्या कार्य विषयक आणि मोदीजींना भेटण्याची त्यांची इच्छा याविषयी लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख पुणे नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष मधुमिलींद मेहेंदळे यांनी लिहीला होता .तर सन्मान चिन्हाचा मजकूर आकाशवाणीचे सुनिल देवधर यांनी तयार केला होता. तसेच खासदार मेधा कुलकर्णी यांच्या मदतीने या सगळ्यांची भेट पंतप्रधान मोदी यांच्यासह ठरवली गेली .त्यात पंधरा मिनिटे पंतप्रधानांशी संवाद साधण्याचे भाग्य या सगळ्यांना लाभले.
जयराम फगरे यांनी पंतप्रधानांचा गौरव पुणेरी पगडी , शाल ,सन्मान चिन्ह यासह केला. तसेच सुनील देवधर यांनी पंतप्रधानांना पुस्तके भेट दिली. एकता मासिकाच्या संपादिका रुपाली भुसारी यांनी एकताचा दिवाळी अंक पंतप्रधानांना भेट दिला. यावेळी एकता मासिक खूप जूने असून आपल्या स्मरणात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.