विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानी समूहाचे अब्जाधीश अध्यक्ष गौतम अदानी यांना अटक करण्याची मागणी केली आहे. सौरऊर्जा करारासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्स लाच दिल्याचा आरोप अदानी यांच्यावर लावण्यात आला आहे.हा माणूस अजूनही मोकळा कसा ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे. या संदर्भात राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती.या पत्रकार परिषदेत त्यांनी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी करत अदानींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे .
अदानी यांनी अमेरिकन आणि भारतीय अश्या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन केले आहे. असे म्हणत अदानी यांना अटक करून त्यांची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांच्या संरक्षक असलेल्या आणि सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना त्यांच्या पदावरून हटवले पाहिजे.अशी मागणी करत मोदी सरकार अदानींना संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे .भाजप सरकार अदानींना वाचवेल, हे आम्हाला माहिती आहे. अदानी यांनी २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अटक केली जात नाही, अदानी आताही तुरुंगाबाहेर का आहेत? त्यांना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी”, असे राहुल गांधी म्हणाले आहेत