राज्यात विधानसभा निवडणुकीचे कल समोर आले असून महायुती २०० जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे.
महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता देशभरात लागली होती. महायुती विरुद्ध महविकास आघाडी अशी थेट लढत 288 मतदारसंघात पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती वि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी मैदानात होती. दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा उमेदवार उभे करून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 288 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 145 ही मॅजिक फिगर असणार आहे.
असेच कल कायम राहिल्यास महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ५८ जागांवर आघाडीवर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ३५ जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप सर्वाधिक १११ जागांवर आघाडीवर आहे,
दरम्यान, महाविकास आघाडी (MVA) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार (NCP-SP) ९ जागांवर, काँग्रेस २० जागांवर आणि उबाठा १८ जागांवर आघाडीवर आहे. तर आघाडीचा भाग असलेल्या समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत
जन सुराज्य शक्ती (जेएसएस)सह इतर पक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत. पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (PWPI) दोन जागांवर आघाडीवर आहे आणि स्वतंत्र भारत पक्ष (SBP) प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.