एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगे यासह महायुतीने २०० पारचा नारा दिला होता भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे दिग्गज नेते महाराष्ट्र्रात प्रचारासाठी मैदानांत उतरले होते. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जनतेला चांगलीच भावल्याचे दिसून आले. या सगळ्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला आहे.आता महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडली असून सर्वात जास्त जागा भाजपने मिळवलेल्या दिसत आहे.सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारा १४५ चा आकडा भाजप पक्ष एकटाही गाठू शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात २०१९ साली आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मोदी लाटेपेक्षाही मोठी लाट यंदा आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांवरून महाराष्ट्रात महायुतीची लाट नाहीतर त्सुनामी आल्याचे दिसत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा भाजपने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांमध्ये भाजप १२६ जागांच्याही पुढे आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता त्याही पुढे जात भाजप १२६ जागांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यात भाजपा-महायुतीची लाट आल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकांमधील आता समोर आलेल्या कलानुसार भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी भाजप 20, शिवसेना शिंदे गट 08, राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 04, शिवसेना ठाकरे गट 03, तर राष्ट्रवादी शरद पवार गट 06 जागांवर आघाडीवर आहे.
मराठवाड्यात 46 जागांपैकी भाजपला 15 जागांवर आघाडी मिळाली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 02 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 06, शिवसेना ठाकरे गट 03 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही.
विदर्भातील 62 जागांपैकी भाजप 45, शिवसेना शिंदेगट 05 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट 03 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 07 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळवता आलेली नाही.
उत्तर महाराष्ट्रात 47 जागांपैकी भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट 10, अजित पवार गट 10 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 03, राष्ट्रवादी शरद पवार गट 01 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट सध्या कुठेही चित्रात नाही.