Maharashtra Election Results 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. आज साकळपासून राज्यात उत्सुकतेचं वातावरण आहे. राज्यात दोन आघाड्यांमध्ये चुरशीची लढाई होईल असं बोललं जात होतपण मतमोजणीला सुरुवात झाल्या पासून, महायुतीच आघाडीत दिसून आली.
राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन करेल असं स्पष्ट दिसत आहे. शिंदे-फडणीस सरकारमध्ये नंतर सामील झालेले अजित पवार यांची राष्ट्रवादी 39 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या यशाबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभेचा निकाल येताच अजित पवारांनी आपल्या एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. अजित पवारांनी आपल्या एक्सवर एक फोटो शेअर करत महाराष्ट्रानं गुलाबी रंगाला निवडलं, असं कॅप्शन दिलं आहे.
खरं तर अजित पवारांनी प्रचारावेळी गुलाबी रंगाचं कॅम्पेन चालवल होत. त्यानंतर मात्र, विरोधक अजित पवारांच्या गुलाबी रंगाच्या कॅम्पेनवर टीका करत होते. अशा परिस्थितीत विधानसभेचा निकाल आल्यानंतर मात्र, अजित पवारांनी विरोधकांची बोलती बंद केली आहे.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1860211799163109784
मिळालेल्या माहितीनुसार येत्या २५ नोव्हेंबरला महायुतीचा शपविधी कार्यक्रम पार पडणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महायुतीमधून कोण मुख्यमंत्री होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे बोलले जात आहे. मात्र, नुकत्याच एका प्रतिक्रियेत एकनाथ शिंदे यांनी कोणत्या पक्षाच्या जागा जास्त असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल अशी प्रतिक्रिया दिली होती. एकंदरीतच येणार काळ मुख्यमंत्र्यांचा चेहरा स्पष्ट करेल. असे चित्र आहे.