ज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे चित्र बरेचसे स्पष्ट झाले आहे. महायुतीला मिळणारे स्पष्ट बहुमत दृष्टीक्षेपात आले असून महायुतीकडून सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीने शपथविधीसाठी २५ नोव्हेंबरचा विचार सुरू केला असल्याचे सांगितले जात आहे .येत्या २६ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने त्याआधीच सत्तास्थापन करण्याचा महायुतीचा मानस असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपा विधीमंडळ सदस्य बैठक 25 तारखेस होणार आहे असे सांगितले जात आहे. तर 26 नोहेंबर रोजी शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप ,राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये त्या दृष्टीने हालचालींना सुरवात झाली आहे.
सध्याच्या स्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. “महायुतीत भाजपच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील”, असे भाजप नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील असे सांगितले आहे.
भाजपाने 128 जागांचा पल्ला गाठल्याने भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. तर याविषयीचा निर्णय सांसदीय समिती घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.