“मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी एक पत्रकार परिषदेत घेत स्पष्ट सांगितलं की, मुख्यमंत्री पद हे कोणत्याही निकशावर नाही. मुख्यमंत्रिपद हे तीनही पक्षाचे नेते ठरवतील. एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तसेच अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच आमच्या पक्षाचे पार्लमेंट बोर्डातील नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. आमच्यात यावरून कोणताही वाद नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात पून्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महायुतीला बहुमत मिळालेले दिसले. महाराष्ट्रात 228 जागांवर महायुती आघाडीवर आहे. त्यापैकी 132 जागांवर भाजप विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशास्थितीत महायुती येत्या दोन दिवसात राज्यात सरकार स्थापन करेल. मात्र, अजूनही महायुतीमधून कोण मुख्यमंत्री पदी बसणार ? असा प्रश्न आहे. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी याबाबत प्रतिक्रिया देत लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. असं म्हंटल आहे.
दरम्यान, राज्यात मिळालेल्या यशानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार, यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या राज्यभरात महायुतीच्या विजयाचा गुलाल उधळला जात असून, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करत आहेत, तसेच फटाके फोडून जल्लोष करत आहेत.