बांगलादेशात विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळलेला दिसत आहे. वैद्यकीय विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ राजधानी ढाक्यातील अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शासकीय शाहिद सुहरावर्दी महाविद्यालयाची तोडफोड केली आहे . विद्यार्थ्यांच्या जमावाने सुहरावर्दी कॉलेज कॅम्पसमध्ये घुसून 6 वाहनांची तोडफोड केली. यानंतर आंदोलकांचा जमाव कबी नजरुल शासकीय महाविद्यालयाच्या दिशेने गेला, महाविद्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु महाविद्यालयाच्या परिसरात प्रवेश करता आला नाही. यादरम्यान दोन गटांमध्ये हाणामारीही झाली, त्यात 30 जण जखमी झाले.
आंदोलकांनी ढाका नॅशनल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलवरही हल्ला केला, जिथे 18 वर्षीय विद्यार्थी अभिजित हलदर डॉ. महबुबुर रहमान मुल्ला कॉलेजच्या निष्काळजीपणामुळे 18 नोव्हेंबरला मृत्यू झाला होता. आंदोलक विद्यार्थ्यांनी रुग्णालयाचे गेट आणि काचांची मोडतोड केली.१६ नोव्हेंबरला १२वीत शिकणाऱ्या अभिजितला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले,मात्र तिथे १८ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला. त्याचे रूममेट सियाम आणि आफताब यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हंटले होते की रुग्णालयात चुकीच्या उपचारांमुळे त्याचा मृत्यू झाला आहे .
21 नोव्हेंबर रोजी त्याच्या मित्रांनी रुग्णालयासमोर आंदोलन केले. त्यात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थीही सामील झाले. रविवारी सकाळी सुहरावर्दी कॉलेजच्या आजूबाजूच्या शोरूममध्ये विद्यार्थ्यांनी लूट केली. यानंतर ढाक्यातील महाविद्यालये, वसतिगृहे आणि प्रार्थनास्थळांभोवती लष्कर तैनात करण्यात आले आहे.