पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी भारतातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत .
एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान म्हंटले आहेत की, “भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या शुभ प्रसंगी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. #75YearsOfConstitution”
तसेच गृहमंत्री अमित शाह यांनीही ‘संविधान दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत , त्यांनी म्हंटले आहे की संविधान हा ‘न्याय आणि समान हक्क सुनिश्चित करणारा राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा मंत्र आहे.’
‘संविधान दिना’च्या हार्दिक शुभेच्छा. आज भारत संविधानाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्यासह संविधानाच्या सर्व शिल्पकारांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी मोदीजीनी या दिवसाची सुरवात केली. लोकशाहीची ताकद भारतासारखा विशाल देश हे आपले संविधान आहे, जे प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि समान हक्क प्रदान करून राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र देते, संविधान हे केवळ रंगमंचावर दाखविले जाणारे पुस्तक नाही, तर ती एक गुरुकिल्ली आहे ज्याचा वापर करून आपण सार्वजनिक जीवनात चांगले योगदान देऊ शकतो. या संविधान दिनी आपण एक सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प करूया. #75YearsOfConstitution”.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी ‘संविधान दिना’च्या शुभेच्छा देत म्हंटले आहे की , 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून घोषित केल्याने लोकांचा सहभाग वाढला आहे, पंचतीर्थ सारख्या उपक्रमांनी डॉ. बी.आर.आंबेडकर यांचा गौरव केला जात आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान दिन आणि राष्ट्रीय कायदा दिन असा उल्लेख करत एक्सवर याबाबत पोस्ट केले आहे. त्यांनी संविधानाला भारताच्या लोकशाहीचा आत्मा म्हणून अधोरेखित केले आहे .प्रगतीशील संविधान निर्माण केल्याबद्दल आंबेडकर आणि इतर देशभक्तांचा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये गौरव केला आहे.
“भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. संविधान दिनानिमित्त मी बाबासाहेब आंबेडकर जी आणि देशाला पुरोगामी संविधान देणाऱ्या सर्व देशभक्तांना वंदन करतो. भारतीय संविधान दिनाच्या आणि राष्ट्रीय कायदा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” असे त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणले आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल ह्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटंले आहे की “आज आपण ७५ वा संविधान दिन साजरा करत आहोत. हा भारतासाठी एक खूप महत्वाचा आणि विशेष दिवस आहे. ज्या दिवशी डॉ. आंबेडकरांचा क्रांतिकारी मजकूर संविधान सभेने स्वीकारला होता. भारताचे संविधान हे केवळ एक दस्तऐवज नाही, तरतो भारताचा आत्मा आणि शतकानुशतके चालू असलेला इतिहास आहे. 140 कोटी भारतीयांना आशा देणारा जिवंत दस्तावेज, संविधान हेच न्यायाचा आदर्श समोर ठेवते. पंडित नेहरू, डॉ. आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, के.एम. मुन्शी, सरोजिनी नायडू, मौलाना अब्दुल कलाम आझाद, यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळे भारतातील समानता, सर्वसमावेशकता आणि लोकशाही जिवंत राहावी यासाठी आपण एकत्र येऊ या. ज्या वेळी राज्यघटनेचा नाश करणाऱ्यांकडून त्याप्रति निष्ठावान बांधिलकी दिसून येत आहे, तेव्हा तिचे संरक्षण करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आपले कर्तव्य आहे”.