बांगलादेशमध्ये आज इस्कॉनचे हिंदू धर्मगुरू चिन्मय प्रभू उर्फ चिन्मय कृष्ण दासचिन्मय कृष्ण दास यांना अटक आणि जामीन नाकारल्याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या अटकेविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबाबतही संताप व्यक्त केला आहे.
असे अल्पसंख्याक हिंदूंवर हल्ले करणारे गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत .मात्र शांततेत सभा घेऊन न्याय्य मागण्या मांडणारे धर्मगुरूंवर देशद्रोहाचे आरोप केले जात आहेत.हे दुर्दैव असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले आहे.
ही घटना बांगलादेशातील अतिरेकी घटकांकडून हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर झालेल्या अनेक हल्ल्यांनंतरची प्रतिक्रिया आहे.अल्पसंख्याकांची घरे दुकानांची जाळपोळ आणि लूटमार, तसेच चोरी आणि तोडफोड आणि देवता आणि मंदिरांची विटंबना अशी अनेक प्रकरणे बांगलादेशात गेले काही दिवस घडत आहेत.
चिन्मय कृष्ण दास यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप निराधार आणि निंदनीय असून इस्कॉनचा जगात कुठेही दहशतवादाशी संबंध नाही. असे स्पष्ट करत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारने चिन्मय कृष्णा दास यांची तात्काळ सुटका करावी असे सुचवले आहे.
दरम्यान भारतातील सर्व हिंदू भिक्षूंनी याच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन केले आहे. इस्कॉन कडून भारताला चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेबाबत बांगलादेशी सरकारशी बोलण्याची विनंती करण्यात आली आहे.
चिन्मय कृष्ण दास यांना आज सकाळी 11 वाजता चितगाव सहाव्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश काझी शरीफुल इस्लाम यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.चिन्मय कृष्ण दास यांच्या वकिलांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.