भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत टीम इंडियाने काल कर्णधार रोहित शर्मासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली आहे .टीम इंडियाची दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवली जाणार आहे.तसेच ते 30 नोव्हेंबरपासून पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय दिवस-रात्र सराव सामना खेळणार आहेत .पंतप्रधान इलेव्हनचे नेतृत्व अष्टपैलू जॅक एडवर्ड्स करणार आहे. भारतीय संघ 28 नोव्हेंबरला सकाळी पर्थहून कॅनबेराला पोहोचला आहे
पीएम अल्बानीज यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलने या बैठकीचा फोटो शेअर केला आहे. यावेळी अल्बानीज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग करत आपला संदेश दिला आहे.
या भेटीदरम्यान अल्बानीज यांनी भारतीय संघाशीही चर्चा केली. कर्णधार रोहित शर्माने त्याची त्याच्या सहकाऱ्यांशी ओळख करून दिली. यावेळी अल्बानीज यांनी जसप्रीत बुमराहला सांगितले की, त्याची शैली इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा खूप वेगळी आहे. तसेच त्यांनी विराट कोहलीला सांगितले की, तुझी पर्थमधील कामगिरी खूप चांगली होती.. यावेळी कॅनबेरी येथील संसदेमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने छोटेखानी भाषणही केले.
भारताचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने खेळत आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करून मालिकेमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने सोमवारी 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला आहे. कर्णधार जसप्रीत बुमराहने 8 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 3 बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले