प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरावर तसेच ऑफीसमध्येही ईडीने धाड टाकली आहे. शिल्पा -राज यांच्या घरात आणि ऑफीसमध्ये ईडीने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी ईडीचे हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ह्याचे कारण तिचा नवरा राज कुंद्रा ठरला आहे. पॉर्नोग्राफी केस प्रकरणाशी संबंधीत असलेल्या प्रकरणावरून आता ईडीने त्यांच्या घरी धाड घातली आहे. ही धाड शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझ येथे असलेल्या घरी अधिकाऱ्यांनी सकाळी 6 वाजता घातली आहे .यापूर्वीही पॉर्नोग्राफी केस प्रकरणात राज कुंद्राला यापूर्वी अटक झाली होती.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज कुंद्रा यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले आहेत. राज यांच्या घर, कार्यालय आणि इतर ठिकाणी हा छापा टाकण्यात आला. राजची पत्नी शिल्पा आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांवरही छापेमारी झाल्याची माहिती आहे. पॉर्नोग्राफीचे हे प्रकरण अनेक वर्षे जुने आहे, मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ईडीची टीम एकूण 15 ठिकाणी छापे टाकत आहे. वास्तविक, या प्रकरणात देशात जमा झालेला पैसा या व्हिडिओंच्या माध्यमातून परदेशात हस्तांतरित करण्यात आला होता.अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यात आली, ज्याचा तपास आता ईडीने सुरू केला आहे.
2021 साली राज कुंद्रा यांच्यावर याच केस संदर्भात आरोप करण्यात आले होते. याच प्रकरणासंदर्भात कारवाई म्हणून एप्रिल 2024 मध्ये ईडीने राज कुंद्रा यांची 97 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच PMLA, 2002 अंतर्गत राज कुंद्रा यांच्यावर सध्या खटला चालू आहे. तसेच राज कुंद्रा हे 2018 सालीदेखील वादात सापडले होते. त्यावेळी सक्तवसुली संचालनालयाने राज कुंद्र यांची 2000 कोटी रुपयांच्या बिटकॉईन घोटाळ्याबाबत चौकशी केली होती