ओमानमध्ये झालेल्या ज्युनिअर आशिया कप 2024 फायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5-3 ने लोळवत मेन्स हॉकी टीम इंडियाने ज्युनिअर आशिया कप ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडियाच्या हॉकी संघाने विजेतेपद प्राप्त केले आहे.
गतविजेत्या टीम इंडिया यासह या स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे. टीम इंडियाने खेळलेले या स्पर्धेतले सर्व सामने जिंकले. हॉकी टीम इंडियावर या विजयानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे. हॉकी टीम इंडियाने याआधी 2004, 2008, 2015 आणि 2023 साली ही ट्रॉफी जिंकली होती.
ज्युनियर आशिया चषक 2024 जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1864534623138566407
याबाबत पंतप्रधानांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हंटले आहे की, “आम्हाला आमच्या हॉकी चॅम्पियनचा अभिमान आहे. भारतीय हॉकीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे कारण आमच्या पुरुष कनिष्ठ संघाने ज्युनियर एशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांचे अतुलनीय कौशल्य, अतुलनीय संयम आणि अतुलनीय सांघिक कार्य यामुळे क्रीडा वैभवाच्या इतिहासात या विजयाची नोंद झाली आहे. युवा चॅम्पियन्सचे अभिनंदन आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”.