हिवाळी अधिवेशनाच्या 12 व्या दिवशी आज संसदेतील गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे .
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड़ म्हणाले की , “मला सभागृहाचे कामकाज गोंधळामुळे थांबवावे लागत असून सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.”
तसेच लोकसभा सभागृहाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना आक्षेप घेत सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करून कामकाज पुन्हा २ वाजेपर्यंत तहकूब केले.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड़ यांनी यापूर्वी संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान बोलताना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि असे म्हटले की, देश भारतीय संविधान स्वीकारल्यानंतर 25 व्या वर्षात प्रवेश करत असताना हे अधिवेशन चालू झाले आहे. संसदेच्या सर्व सदस्यांना सभागृहाच्या पावित्र्याचा आदर करण्याचे आणि कामकाजात अडथळा आणणारी कृती टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच संसदीय कार्यपद्धती आणि विधायक चर्चेची गरज अधोरेखित करून त्यांनी सभागृहाला कोणीही स्तब्ध करू नये यावरही भर दिला
आजही लोकसभा प्रांगणात राहुल गांधींसह विरोधी खासदारांनी अदानी प्रकरणावर संसदेच्या आवारात निदर्शने केलेली दिसून आली. मात्र या आंदोलनात तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे सदस्य सहभागी झाले नाहीत.
हिवाळी संसदेचे पहिले अधिवेशन 25 नोव्हेंबर रोजी सुरू झाले, दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाल्यामुळे लवकर तहकूब करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे