डहाणूकर कॉलनी कोथरूड परिसरातील गोसावी वस्तीत रविवारी रात्री दोन मिशनऱ्यांनी गरीब हिंदू लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची फसवणूक करत धर्मांतराचा कट करायचा प्रयत्न केला .पण, जागरूक तरुणांनी वेळीच त्यांचा कट उधळून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
डहाणुकर कॉलनी जवळील गोसावी वस्तीत ‘पॅस्टर’ गोपाळ रणदिवे आणि त्याची पत्नी ‘सिस्टर’ आशा रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली एक मिशनरी गट गरिबांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्याकडून ‘बंधनमुक्त सेवा कार्य’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून हे धर्मांतराचे काम सुरू होते.
या मिशनऱ्यांनी लोकांना आर्थिक आणि आरोग्याच्या अडचणीच्या स्थितीत वेठीस धरून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी फसवले. रणदिवे दाम्पत्य लोकांना आमिष दाखवून, त्यांची दिशाभूल करून धर्मांतरण करत असे.
‘पॅस्टर’ रणदिवे आणि ‘सिस्टर’ आशा लोकांना एक विशेष ‘आशीर्वाद तेल’ देत होते. त्यांचा असा दावा होता की, हे तेल आरोग्याच्या सर्व समस्यांवर प्रभावी आहे.
असाच एक कार्यक्रम काल गोसावी वस्तीत आयोजित केला होता. तेथे जमलेल्या काही लोकांना आलेले अनुभव ‘सिस्टर’ आशाने सांगितले. “या तेलाने आणि ‘येसुच्या आशीर्वादाने’ त्यांच्या आरोग्याच्या समस्या संपल्या आहे. तुम्ही स्विकारल्यानंतर तुमचीही सैतानापासून सुटका होईल,” असे सांगितले. मात्र, काही जागरूक तरुणांना त्यांचा कट उधळून लावला. ते मिशनऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात घेऊन गेले.
गोपाळ आणि आशा रणदिवेच्या विरोधात त्वरित तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर “फसवणूक, धमकावून धर्मांतर करणे, आणि भेटवस्तू आणि आर्थिक लाभ देऊन लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणे” या आरोपाखाली भारतीय न्याय संहितेचे कलम ३०२, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ, व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम ३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि संघटनांनी या संबंधित व्हिडिओ पुरावे देखील पोलिसांना दिले आहेत, ज्यात ‘पॅस्टर’ गोपाळ रणदिवे आणि ‘सिस्टर’ आशा रणदिवे यांचा ‘आपत्तीजनक वर्तन’ स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते लोकांना आशीर्वाद तेल आणि येसुच्या कृपेचा दावा करत असून, लोकांना ख्रिश्चन धर्माकडे वळवण्यासाठी दबाव टाकताना दिसत आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार ह्या पूर्वी उत्तमनगर, रामवाडी, वारजे, राहुल नगर कोथरूड स्टँड जवळ, तेजस सोसायटी, पृथ्वी हॉटेल परिसर अशा ठिकाणी अश्या प्रकारचे कार्यक्रम झाले आहेत, असे दिसून आले आहे. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचा आग्रह केला आहे. अलंकार पोलीस स्टेशनने या प्रकरणीचा पुढील तपास करत आहे.