भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी आज राज्यसभेत जॉर्ज सोरोसवरून काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. जॉर्ज सोरोस काँग्रेसचा नातेवाईक आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावरून राज्यसभेत एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.
राज्यसभेमध्ये 267 कलमांच्या अन्वये लक्ष्मीकांत वाजपेयी कविता पाटीदार आणि सुधांशू त्रिवेदी यांनी उपस्थित केलेल्या चर्चेवर चर्चा व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदार आक्रमक झालेले होते. परंतु वारंवार गोंधळ झाल्यानंतर सुद्धा ही चर्चा होऊ शकली नाही कारण काँग्रेसचे सर्व खासदार या चर्चेला विरोध करत होते. ही चर्चा व्हावी याकरिता डॉक्टर बोंडे यांनी सभापती जगदीप धनखड यांचे माध्यमातून प्रश्न उपस्थित केला की जॉर्ज सोरोस हा काँग्रेसचा नातेवाईक लागतो का ? ही चर्चा थांबवण्याकरिता काँग्रेस का प्रयत्न करीत आहे? आणि यामुळे सभागृहात गोंधळ उडाला.
अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असून बांगलादेशातील सत्तांतरात देखील जॉर्जचा हात आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळून टाकण्याकरिता जॉर्ज सोरोस सातत्याने प्रयत्नशील आहे. आणि या सोरो च्या माध्यमातून काँग्रेसच्या सह अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी या संस्थेला भरपूर पैसा प्राप्त झालेला आहे. आपल्या शासनाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने सोरोस माध्यमातून सातत्याने केलेली आहे. असे म्हणत भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी ताशेरे ओढले आहेत. लोकसभेमध्ये सुद्धा अनेक खासदारांनी यावर प्रश्न उपस्थित केलेले आहे.
त्याचप्रमाणे जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस व काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे काय संबंध आहेत यावर चर्चा करण्याकरता 267 कलमान्वये प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र प्रस्तावावर चर्चा होऊ द्यायचेच नाही असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मलिक्कार्जुन खरगे त्याचप्रमाणे काँग्रेसच्या खासदारांनी चंग बांधला होता. आणि ही चर्चा झालीच पाहिजे आणि देशाला जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या देश विघातक कार्याचा भांडाफोड होऊन जनतेला माहिती मिळाली पाहिजे. काँग्रेसच्या सत्तापिसूपणामुळे देशाला कसा धोका निर्माण झालेला आहे आणि जॉर्ज सोरोस च्या माध्यमातून पैसा आणून निवडणुकांमध्ये त्याचप्रमाणे आंदोलनाच्या माध्यमातून देशामध्ये गोंधळ माजवण्याचा प्रयत्न जो केला जातो त्यावर चर्चा झाली पाहिजे हा भाजपच्या सर्व खासदारांचा आग्रह होता. म्हणूनच सभापती जगदीप धनखड यांच्या परवानगीने राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे त्यांनी हा प्रश्न विचारला की, जॉर्ज सोरोस हा काँग्रेसचा नातेवाईक आहे का? काँग्रेस चर्चेला का घाबरतात? परंतु काँग्रेसने केलेल्या विरोधामुळे शेवटपर्यंत ती चर्चा होऊ शकली नाही.