भारताची क्रिकेटर स्मृती मंधानाने आता ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे.स्मृतीने जी कामगिरी केली आहे तशी आतापर्यंत कोणालाही करता आलेली नाही.सांगलीकर स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना शतक खेळी करत विक्रम केला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील हा सामना वाका ग्राउंड, पर्थ येथे खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचे आव्हान दिले आहे.यावेळी उपकर्णधार स्मृतीने धावांचा पाठलाग करताना स्फोटक खेळी करत शतक पूर्ण केले आहे. स्मृती या शतकासह एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अशी खास कामगिरी करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
भारताला ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांत पराभव पत्करावा लागला. पण स्मृतीने तिसरा वनडे सामना मात्र आपल्या फलंदाजीने विशेष बनवला. कारण स्मृतीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना धुळ चारल्याचे पाहायला मिळाले. स्मृतीने तुफानी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक होण्यास भाग पाडले
𝗛𝗨𝗡𝗗𝗥𝗘𝗗!
Vice-captain Smriti Mandhana with her 9th ODI TON! 🙌
Superb knock from the #TeamIndia vice-captain! 👏👏
LIVE ▶️ https://t.co/pdEbkwGszg#AUSvIND | @mandhana_smriti pic.twitter.com/XnxJOqxDBw
— BCCI Women (@BCCIWomen) December 11, 2024
स्मृतीने 103 बॉलमध्ये 97.09 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केले. स्मृतीने या शतकी खेळीत 13 चौकार आणि 1 षटकार लगावला. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे नववे शतक ठरले. तसेच स्मृतीचे हे 2024 या वर्षातील चौथे शतक ठरले. स्मृतीने यासह एका वर्षात 4 शतकं करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू हा बहुमान मिळवला. स्मृतीने 109 बॉलमध्ये 105 धावा केल्या आणि बाद झाली.मात्र स्मृतीने या शतकी खेळीसह टीम इंडियाची एक बाजू लावून धरत निर्णायक भागीदारी केल्याचे दिसून आले.