राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित पाच राज्यांमध्ये धडक कारवाई केली आहे.
जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या अड्ड्यांवर आज पहाटेपासून छापे टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या ऑपरेशनमध्ये दहशतवादी प्रचाराचा प्रसार रोखण्यासाठी आणि अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
दहशतवादविरोधी एजन्सीने पाच राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेऊन जैश ए मोहंमदशी संबंधित शेख सुलतान सलाह उद्दीन अयुबी उर्फ अयुबी नावाच्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आले आहे.आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि जम्मू-काश्मीर या राज्यातील २६ ठिकाणी झडती घेतल्यानंतर आयुबीला ताब्यात घेण्यात आले होते
आजच्या कारवाईनंतर, इतर अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर झडतीदरम्यान, एनआयएच्या पथकांनी अनेक दोषी कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पॅम्प्लेट्स आणि मासिके जप्त केली आहेत. .
आधी अटक केलेल्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर आणि या वर्षी ऑक्टोबरमध्ये ज्या संशयितांच्या जागेची झडती घेण्यात आली त्यांच्याविरुद्ध पुरावे तपासल्यानंतर एजन्सीला नवीन माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी ही शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे.
एनआयएने नंतर सांगितले की संशयित दहशतवादी-संबंधित प्रचार प्रसारित करण्यात आणि तरुणांना कट्टरपंथी बनवून जैश ए मोह्हमद संघटनेत तरुणांची भरती करण्याच्या तयारीत होते. तसेच हे संशयित तरुण भारतभर हिंसक दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. अशीही माहिती समोर आली आहे.