महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आधार घेत आता दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकार विधानसभेतील आपले भविष्य आजमावू पाहत आहे.
18 वर्षांवरील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा 2100 रुपये जमा केले जातील असे आश्वासन आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी आज दिले आहे . दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या उपस्थितीत केजरीवाल यांनी ही महिला सन्मान योजना जाहीर केली आहे .या योजनेंतर्गत सध्या दिल्लीतील आप सरकार महिलांना दरमहा 1000 रुपये देणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, आज मी दिल्लीतील लोकांसाठी दोन मोठ्या घोषणा करत आहे. दोन्ही घोषणा महिलांसाठी आहेत. मी आश्वासन दिले होते की मी प्रत्येक महिलेला एक हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाईल. हा प्रस्ताव आज सकाळी मुख्यमंत्री अतिशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे . येत्या 10 ते 15 दिवसांत निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे सध्यातरी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे शक्य नाही.असे मात्र आप सरकारने स्पष्ट केले आहे.
मात्र काही महिलांचे म्हणणे आहे की सध्याची महागाई पाहाता एक हजार रुपये पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही महिलांना दरमहा 2100 रुपये देणार आहोत. या योजनेसाठी उद्यापासून नोंदणी सुरू होईल असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. महिला आपल्या देशाचे भविष्य घडवतात. त्यांच्या कामाला हातभार लावणे हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो. दिल्लीतील दोन कोटी लोकांच्या सोबतीने आम्ही सर्वात मोठे अडथळे पार केले. दिल्लीतील लोकांसाठी चांगले काम करण्यापासून कोणताही अडथळा आम्हाला रोखू शकला नाही असे त्यांनी सांगितले आहे .