भारतीय जनता पार्टीचे शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी, 12 जानेवारी 2025 रोजी प्रदेश अधिवेशन होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली आहे. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी भव्य सत्कार केला जाणार आहे.
12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश भाजपाने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी या वेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला जाणार आहे.
या अधिवेशनासाठी महाराष्ट्रभरातून १० हजार भाजप पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भाजपच्या आगामी योजनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यामध्ये तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे .
स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र भाजप एक मोठा उपक्रम हाती घेत आहे. १२ जानेवारी २०२५ रोजी शिर्डीत भाजपचं प्रदेश अधिवेशन होणार आहे, या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आदरणीय @AmitShah भाई आणि राष्ट्रीय अध्यक्ष माननीय @JPNadda जी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 13, 2024