साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा २’च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी काल पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली होती. त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आले होते.त्यानंतर त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याला कोर्टाने चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र अल्लू अर्जुनला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी एक रात्र चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात घालवावी लागली असून आज तो बाहेर आला आहे.
त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाददेखील साधला आहे .तसेच त्याच्या घराजवळ जमलेल्या चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करत धन्यवाद दिले आहेत. या घटनेवर पहिल्यांदा अल्लू अर्जुन व्यक्त झाला आहे. ही घटना खूप दुखःद आहे. तसेच मी पीडित परिवारासोबत कायम उभा आहे, असेही त्याने म्हंटले आहे. यावेळी त्याने आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हंटले आहे.
काळजी करण्यासारखं काहीही नाही. मी ठीक आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. घडलेली घटना खूप दुर्दैवी होती आणि मी पुन्हा एकदा त्याबद्दल शोक व्यक्त करतो.असे म्हणत अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान मृत महिलेच्या पतीनेही ह्या प्रकरणामध्ये अल्लू अर्जुनचा प्रत्यक्ष काहीही संबंध नसल्याचे सांगत आपण ही केस मागे घेणार असल्याचे नमूद केले आहे.