महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. काल नागपुरात राजभवनात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी महायुतीच्या ३९ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा मंत्रीपदाचा मान मिळाला आहे. 33 आमदारांनी कॅबिनेट म्हणून तर 6 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
भाजपकडून मंत्रीमंडळात तब्बल 8 नव्या चेह-यांचा समावेश करण्यात आला आहे. नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, अशोक उईके, संजय सावकारे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर, भाजप, यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे 19, राष्ट्रवादीचे 9 आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते.
तर शिवसेनेकडून एकूण 11 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यात 5 नव्या चेह-यांध्ये,संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, आशिष जैस्वाल, प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 9 पैकी तब्बल 5 नवे चेहरे देऊन अजितदादांनी अनेक जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाच्या नव्या चेह-यांमध्ये माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी यांचा समावेश आहे
मिळालेल्या माहितीनुसार, शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा नसून अडीच वर्षांचा असणार आहे आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना प्रतिज्ञापत्रही लिहावे लागणार आहे. मात्र हे सूत्र भाजपच्या मंत्र्यांना लागू होईल की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शपथ घेणारे मंत्र्यांची नावे खालीलप्रमणे :
पंकजा मुंडे
गुलाबराव पाटील
हसन मुश्रीफ
अतुल सावे
संजय शिरसाट
दत्तात्रेय भरणे
चंद्रकांत पाटील
भरत गोगावले
नरहरी झिरवाळ
गिरीश महाजन
प्रताप सरनाईक
माणिकराव कोकाटे
राधाकृष्ण विखे पाटील
उदय सामंत
आदिती तटकरे
संजय सावकारे
संजय राठोड
धनंजय मुंडे
जयकुमार गोरे
शंभूराज देसाई
बाबासाहेब मोहनराव पाटील
शिवेंद्रराजे भोसले
इंद्रनील नाईक
नितेश राणे
प्रकाश आबिटकर
आशिष शेलार
आशिष जैस्वाल
अशोक उईके
योगेश कदम
चंद्रशेखर बावनकुळे
मंगल प्रभात लोढा
जयकुमार रावल
गणेश नाईक
आकाश पांडुरंग फुंडकर
माधुरी मिसाळ
पंकज भोईर
मेघना बोर्डीकर
इंद्रनील नाईक
मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे आमदार भोंडेकर यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यासोबतच महायुतीचे घटक पक्ष आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आम्हाला कॅबिनेट मंत्रालय आणि विधानपरिषद देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काहीही साध्य झालेले नाही. महायुतीचा भाग असूनही मला कार्यक्रमाचे निमंत्रणही मिळाले नाही.फडणवीस यांचा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांनाही मोठा धक्का बसला आहे याची वेगवेगळी कारण असली तरी त्यातील प्रमुख कारण म्हणजे राज्यस्तरावरती भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवलेली नाराजी,तसेच मनोज जरांगे यांच्याबाबतची टोकाची भूमिका हे असल्याचे सांगितले जात आहे.