युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला असून ड्रोनद्वारे केलेला हा हल्ला अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यासारखा आहे. युक्रेनने कझानमध्ये 8 ड्रोन हल्ले केले असून त्यापैकी 6 निवासी इमारतींवर झाले आहेत. हा हल्ला मॉस्कोपासून 800 किलोमीटर अंतरावर झाला आहे .अचानक झालेल्या या हल्ल्याने रशियाच्या कजान शहरात सर्वत्र गोंधळाची स्थिती परिस्थिती पसरली असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तसेच तेथील शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कजान एअरपोर्ट सुद्धा बंद करण्यात आला आहे.या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
🔴|| Another Attack on Residential Building in Kazan, Russia by Ukrainian Drone 🇺🇦🇷🇺 ||•√
🔴🔴A Ukrainian drone has once again struck a residential building in Kazan, Russia, highlighting the ongoing conflict and its impact on civilian structures.•√#Kazan pic.twitter.com/QYRXUXoE3c
— Zulfiqar Siddiquizada🇵🇰 (@SiddiquiZadaa) December 21, 2024
प्राथमिक माहितीनुसार, कामलेव एवेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, युकोजिंस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्नाया पॉजित्सिया या इमारतींना जाऊन ड्रोन्सनी धडक दिली आहे .या हल्ल्यात कोणाचा मृत्यू किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, हल्ला झालेल्या ठिकाणाहून सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
अवघ्या चार दिवसांपूर्वी रशियाचे अण्वस्त्र प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मंगळवारी मॉस्कोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झाला होता. हल्ल्याच्या वेळी, किरिलोव्ह अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना जवळ उभ्या असलेल्या स्कूटरचा स्फोट झाला. यामध्ये किरिलोव्हसोबत त्यांचा सहाय्यकही मारला गेला होता.
आता युक्रेनकडून झालेल्या या हल्ल्यानंतर रशिया काय प्रत्युत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.