प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. याशिवाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रपतींनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “श्याम बेनेगल यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या गौरवशाली अध्यायाचा अंत झाला आहे. त्यांनी चित्रपटांना नवीन आयाम दिला,तसेच अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले. एक संस्था म्हणून त्यांनी अनेक अभिनेते आणि कलाकारांना प्रशिक्षण दिले. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मभूषण यासह अनेक पुरस्कारांच्या रूपाने त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.
The passing of Shri Shyam Benegal marks the end of a glorious chapter of Indian cinema and television. He started a new kind of cinema and crafted several classics. A veritable institution, he groomed many actors and artists. His extraordinary contribution was recognised in the…
— President of India (@rashtrapatibhvn) December 23, 2024
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या एक्स-पोस्टमध्ये म्हणतात की, “श्याम बेनेगल जी यांच्या निधनामुळे आपल्याला खूप दुःख झाले आहे , ज्यांच्या चित्रपटाच्या रूपातून गोष्टी सांगण्याच्या कलेचा भारतीय चित्रपटसृष्टीवर खोलवर परिणाम झाला. विविध क्षेत्रातील लोक त्यांच्या कार्याचे नेहमीच कौतुक करतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना.
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, श्याम बेनेगल जी यांच्या निधनाने ते दु:खी झाले आहेत, ते एक दूरदर्शी चित्रपट निर्माता होते ज्यांनी भारतातीलगोष्टी संवेदनशीलतेने जिवंत आणि समृद्ध केल्या. चित्रपटसृष्टीतील त्यांचा वारसा आणि सामाजिक समस्यांशी असलेली बांधिलकी पिढ्यांना प्रेरणा देईल जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या दुःखामध्ये ते सहभागी आहेत. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
Saddened by the passing of Shyam Benegal ji, a visionary filmmaker who brought India’s stories to life with depth and sensitivity.
His legacy in cinema and commitment to social issues will inspire generations. Heartfelt condolences to his loved ones and admirers worldwide. pic.twitter.com/J6ARdNiVNV
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 23, 2024
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान व्यक्तिमत्त्व आणि समांतर चित्रपट चळवळीचे खरे प्रणेते, महान चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. कलाक्षेत्रातील त्यांचे अतुलनीय योगदान, विचारप्रवर्तक कथाकथन आणि सामाजिक प्रश्नांशी असलेली सखोल बांधिलकी यांनी अमिट छाप सोडली आहे.
पंडित नेहरूंच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’वर आधारित ‘भारत, एक खोज’ आणि संविधान सभेच्या चर्चेवर आधारित ‘संविधान’ या मालिका या तरुण प्रेक्षकांसाठी मौल्यवान संदर्भबिंदू आहेत, असे ते म्हणाले आहेत. प्रतिष्ठित पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार तसेच 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित, त्यांचा वारसा चित्रपट निर्मात्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांना आमच्या संवेदना.
तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली एक्समध्ये लिहिले आहे की, प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक ‘पद्मभूषण’ श्याम बेनेगल जी यांचे निधन अत्यंत दुःखद आणि चित्रपट जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला जगात एक नवी आणि वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचे अविस्मरणीय योगदान होते. दिवंगत आत्म्याला मोक्ष मिळो आणि त्यांच्या शोकाकुल परिवारातील सदस्यांना आणि चाहत्यांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रभू श्री राम चरणी प्रार्थना. ओम शांती!
प्रख्यात फिल्म निर्माता-निर्देशक 'पद्म भूषण' श्री श्याम बेनेगल जी का निधन अत्यंत दुःखद एवं सिनेमा जगत के लिए अपूरणीय क्षति है।
भारतीय सिनेमा को विश्व में नई और अद्वितीय पहचान दिलाने में उनका अविस्मरणीय योगदान था।
प्रभु श्री राम से प्रार्थना है कि दिवंगत आत्मा को सद्गति और उनके…
— Yogi Adityanath (@myogiadityanath) December 23, 2024