हमास नेता इस्माइल हनीयेहच्या हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याची जाहीर कबुली देत इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी सोमवारी येमेनमधील हौथी बंडखोरांनाही (The Houthi movement) संपवू असे म्हणत कडक शब्दात इशारा दिला आहे.
31 जुलै रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर इस्रायली हवाई हल्ल्यात शीर्ष हिजबुल्ला कमांडर फुआद शुकर मारला गेल्याच्या काही तासांनंतर हमास नेता हनीयेहची हत्या झाली होती.
याह्या सिनवार यांनी हनीहच्या जागी गटाचे लष्करी प्रमुख म्हणून नियुक्ती केली. 16 ऑक्टोबर रोजी दक्षिण गाझा येथे इस्त्रायली लष्करी कारवाईत सिनवार देखील मारला गेला. यानंतर दुसऱ्या एका मोठ्या हत्येत, हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसराल्लाह देखील इस्रायलने मारला आहे.
इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनीही यावेळी सीरियातील बशर अल-असद यांची राजवट उलथवून टाकल्याची कबुली दिली आहे .आम्ही सीरियातील असद राजवट उलथून टाकली आहे,यानंतर आम्ही येमेनमधील हुथी दहशतवादी संघटनेवर कठोरपणे प्रहार करू, जो त्यांच्यासाठी शेवटचा ठरेल.
ऑगस्टच्या सुरुवातीला, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) ने म्हटले होते की हमास नेता इस्माईल हनीयेहला इस्रायलने वॉरहेडसह शॉर्ट-रेंज प्रोजेक्टाइल वापरून ठार मारले आणि “योग्य वेळी बदला घेण्याची योजना आखली होती.असे सांगण्यात आले होते.
“हा दहशतवादी हल्ला झिओनिस्ट राजवटीने (इस्रायल) तयार केला आणि अंमलात आणला आणि त्याला अमेरिकेच्या गुन्हेगारी सरकारने पाठिंबा दिला,” असा इराणने आरोप केला आहे.