राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. हा राज्यपाल नियुक्तीचा आदेश मंगळवार २४ डिसेंबर रोजी रात्री काढण्यात आला आहे . या आदेशानुसार माजी लष्करप्रमुख आणि केंद्र सरकारचे माजी राज्यमंत्री व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल झाले आहेत . गृह मंत्रालयाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला मणिपूरचे राज्यपाल झाले आहेत . राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मिझोरामचे राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचवेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाचे विद्यमान राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामाही स्वीकारला आहे.
या मालिकेत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बिहारचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची केरळचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी लष्करप्रमुख विजय कुमार सिंह यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती देण्यात आली आहे. माजी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना राष्ट्रपती भवनाने जारी केली आहे. अजय कुमार भल्ला हे 1984 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. अजय कुमार भल्ला यांची 22 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 22 ऑगस्ट 2024 पर्यंत जवळपास 5 वर्षे भारताचे गृहसचिव म्हणून काम केले आहे. मणिपूरमध्ये हिंदू मैतेई आणि ख्रिश्चन कुकी यांच्यात सध्या संघर्ष सुरू आहे. नवे राज्यपाल नियुक्त झाल्यानंतर हा संघर्ष सोडवण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काही प्रयत्न केले जटिल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
या सर्व नियुक्त्या ज्या तारखेपासून हे नवीन राज्यपाल त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील त्या तारखेपासून प्रभावी होतील.