बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने बांगलादेशला कडक इशारा दिला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ढाका येथे आवाहन केले आहे. की बांगलादेश सरकारने देशात असलेल्या सर्व नागरिकांच्या हक्कांचे आणि सुरक्षेचे रक्षण करावे.
नुकतीच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यात फोनवर चर्चा झाली. यावेळी अनेक विशेष मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. .
या संभाषणादरम्यान, युनूसने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील हल्ल्यांबाबत वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्माच्या लोकांचे संरक्षण करण्याचे मान्य केले आहे .व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी धर्माची पर्वा न करता सर्व नागरिकांची सुरक्षा आणि अधिकारांचे रक्षण करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.
जेक सुलिव्हन आणि मोहम्मद युनूस यांच्या चर्चेच्या काही दिवस आधी भारतीय वंशाचे अमेरिकन डेमोक्रॅटिक खासदार श्री ठाणेदार यांनी अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल बांगलादेशला लक्ष्य केले होते. बांगलादेशातील वाढत्या मानवाधिकारांचे उल्लंघन पाहता त्यावर निर्बंध लादले जावेत, असे ते म्हणाले होते. बांगलादेशवर लक्ष्यित निर्बंध लादण्याची आणि अंमलबजावणी करण्याची विनंती त्यांनी अमेरिकेच्या वित्त आणि परराष्ट्र खात्याला केली होती.
ते म्हणाले होते, ‘बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध जघन्य गुन्हे करणाऱ्यांवर निर्बंध लादण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची मी वित्त आणि परराष्ट्र खात्याला विनंती करतो.’