देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यापर्यंत अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना “भारताच्या महान पुत्रांपैकी एक” म्हणून संबोधले आहे ज्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या X वरील एका पोस्टमध्ये, मुर्मू म्हणाल्या आहेत की “सिंग यांना त्यांच्या देशाच्या सेवेसाठी, त्यांच्या अत्यंत विनम्रतेबरोबरच त्यांचे निर्दोष राजकीय जीवन नेहमीच लक्षात ठेवले जाईल. “त्यांचे जाणे आपल्या सर्वांचे मोठे नुकसान आहे. मी भारताच्या या महान सुपुत्राला आदरांजली अर्पण करते आणि त्यांचे कुटुंब, मित्र आणि प्रशंसक यांच्याबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करते,” असे त्या म्हणाल्या आहेत.
Former Prime Minister Dr Manmohan Singh Ji was one of those rare politicians who also straddled the worlds of academia and administration with equal ease. In his various roles in public offices, he made critical contributions to reforming Indian economy. He will always be…
— President of India (@rashtrapatibhvn) December 26, 2024
“मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती.त्यांचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील.” या आशयाची पोस्ट कॉँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केली आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि देशाने आपला एक महान सुपुत्र गमावल्याचे सांगितले. “आज देशाने आपला एक महान सुपुत्र गमावला आहे. माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. विकासात्मक राजकारण आणि प्रशासनाचे प्रणेते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सेवेसाठी नि:स्वार्थपणे वाहून घेतले होते. ते आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे आदर्श आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील, असे सोरेन यांनी आपली एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबाला आणि देशवासीयांना हा दु:खद क्षण सहन करण्याची शक्ती आणि धैर्य देवो,” असे सोरेन यांनी पुढे म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटंले आहे की, भारत आपल्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे दुःखी आहे. सामान्य पार्श्वभूमीतून येऊन ते एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्र्यांसह अनेक पदांवर काम केले. आमच्या आर्थिक धोरणावर वर्षानुवर्षे खोल छाप सोडली. संसदेतील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
पंतप्रधानांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा डॉ. मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा आम्ही रोज बोलायचो. शासनाच्या विविध मुद्द्यांवर आम्ही सखोल चर्चा करायचो. त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता नेहमीच पाहायला मिळत होती. या दुःखाच्या प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मित्रांना आणि असंख्य चाहत्यांसाठी मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती”
Dr. Manmohan Singh Ji and I interacted regularly when he was PM and I was the CM of Gujarat. We would have extensive deliberations on various subjects relating to governance. His wisdom and humility were always visible.
In this hour of grief, my thoughts are with the family of… pic.twitter.com/kAOlbtyGVs
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2024