चेन्नईच्या अन्ना विद्यापीठात विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावर भाजपने आवाज उठवला आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी सत्ताधारी द्रमुक सरकारवर टीकास्त्र सोडत शपथ घेतली आहे की जोपर्यंत राज्यात द्रमुकचे सरकार पडत नाही, तोपर्यंत अनवाणी फिरेन. हातात बूट घेत त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी पत्रकार परिषदेत सत्तेतील स्टॅलिन सरकार आणि राज्यातील पोलीस खात्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.अन्नामलाई म्हणाले आहेत की, गुन्हेगाराचे द्रमुक नेत्यांशी संबंध होते, त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासही उशीर केला तसेच एफआयआरही मुद्दाम लीक केल्याचा आरोप अन्नामलाई यांनी केला आहे. तो लीक झाल्यामुळे पीडितेची ओळख उघड झाली असून पोलिसांनी जाणूनबुजून पीडितेला लाज वाटेल अशा प्रकारे एफआयआर लिहिला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
Tamil Nadu BJP President K Annamalai says, "Tomorrow, I will hold a protest in front of my house, where I will whip myself 6 times. Starting from tomorrow, I will fast for 48 days and appeal to the six-armed Murugan. Tomorrow, a protest will be held in front of the house of every… pic.twitter.com/wMjnc0KV23
— ANI (@ANI) December 26, 2024
यामुळे सत्तेत असलेल्या द्रमुकवर निशाणा साधत अन्नामलाई म्हणाले आहेत की,स्टॅलिन सरकार राज्याच्या वास्तविक मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी राजकारण खेळत आहे. ते म्हणाले आहेत की, द्रमुक सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी फूट पाडण्याचे काम करत आहे.त्यामुळे लैंगिक गुन्हे वाढत चालले असून सरकार आणि पोलीस याबाबत निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले आहेत की, ‘द्रमुक सरकार पाडेपर्यंत मी अनवाणी चालेन. तसेच आपण पैसे न वाटता निवडणूक लढवू. जोपर्यंत डीएमके सरकार जात नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही.तसेच अन्नामलाई यांनी या सर्व वाईटाचा नायनाट करण्यासाठी’ कोईम्बतूरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर स्वतःला चाबकाचे सहा वेळा फटके मारण्याचे वचन दिले आहे. तसेच राज्यातील भगवान मुरुगन यांच्या सर्व सहा पवित्र मंदिरांना भेट देणार असून ४८ दिवस उपवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी अण्णा विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय आरोपीला अटक केली असून अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचे नाव ज्ञानशेखरन असे असून तो रस्त्याच्या कडेला बिर्याणी विकत होता.ही घटना पहाटेच्या सुमारास घडली जेव्हा पीडित मुलगी आणि तिचा पुरुष मित्र जवळच्या चर्चमध्ये प्रार्थना करून विद्यापीठ कॅम्पसमध्ये परतत होते. दोघांनाही एका निर्जन ठिकाणी दोन जणांनी थांबवले आणि हल्लेखोरांनी विद्यार्थिनीला मारहाण करून मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती.