भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघाने देखील मेलबर्नच्या मैदानातून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळत असलेल्या टीम इंडियानेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
https://twitter.com/BCCI/status/1872446534450811138
भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी रात्री उशिरा आजाराने निधन झाले. देशाच्या माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा मोठा क्रिकेटपटू किंवा देशाच्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला श्रद्धांजली वाहायची असते, तेव्हा संघाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरतात. अशा परिस्थितीत हजारो मैल दूर टीम इंडियाच्या खेळाडूंनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.तसेच अनेक क्रिकेटपटूंनी ट्विट करत मनमोहन सिंह यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह यांनी ट्विटरवरून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन .सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ९२ वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे डॉ. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (२६ जानेवारी २०२४) रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंग हे २००४ ते २०१४ या दशकभराच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते.आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान या प्रवासात त्यांनी देशासाठी जे योगदान दिले आहे, ते अनमोल आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.